Top News महाराष्ट्र मुंबई

“अशी फाटक्या झोळीला ठिगळे लावण्यापेक्षा मोदीजी जरा इकडे बघा…”

मुंबई | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारत भेटीवर येत आहे. यावेळी गुजरात दौऱ्यावर असताना त्यांना वाटेत झोपडपट्टी दिसू नये यासाठी एका ठिकाणी भिंत उभारली जात आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं आहे.

मोदीजी भिंत बांधण्याआधी जरा इकडे बघा…ट्रम्प यांनी भारत देशालाच गरीबीत काढलेय..विकसनशील देशांच्या यादीतून भारत बाहेर.., असं म्हणत राष्ट्रवादीनं टीकास्त्र सोडलं आहे. यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या २४ फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते अहमदाबादलाही भेट देणार असल्याने तिथल्या झोपड्या लपवण्यासाठी एक ६०० मीटरची भिंत बांधण्यात येत आहे… पण, अशी फाटक्या झोळीला ठिगळे लावण्यापेक्षा मोदीजी जरा इकडे बघा…, असं म्हणत राष्ट्रवादीनं टीका केली आहे.

गरिबी झाकण्याची आता गरज नाही, कारण, ट्रम्प यांनी भारताला विकसनशील देशांच्या यादीतून वगळले असून अक्षरशः गरिबीत काढले आहे. त्यामुळे आता भारताला अमेरिकन करांतून निर्यातीत सूट मिळणार नाही, असं फेसबुक पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंद्धश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

माझा ‘हिंदुहृदयसम्राट’ किंवा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करु नका- राज ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

‘सविता भाभी…तू इथंच थांब’ होर्डींग्सचं कोडं उलगडलं

मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींना केले नग्न!

राजकारणातील खरे चाणक्य तुम्ही की शरद पवार? अमित शहा म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या