महाराष्ट्र मुंबई

नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भाजपने उमेदवारी दिली असती- काँग्रेस

मुंबई |  साध्वी प्रज्ञासिंग हिला भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यावरून भाजपवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. यावरच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा ठाकूरच्या उमेदवारीचे भाजपाकडून होणारे समर्थन पाहता, नथुराम गोडसे जिवंत असता तर त्यालाही भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली असती, अशी टीका सचिन सावंत यांनी भाजपवर केली आहे.

उद्या तुम्हाला दाभोलकर, पानसरेंचे मारेकरीही भाजपचे उमेदवार दिसतील, असं सावंत यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी साध्वींच्या उमेदवारीची पाठराखण केली आहे.

दहशतवादाचे गंभीर आरोप ज्या व्यक्तीवर आहेत, अशा व्यक्तीचं भाजप निर्लज्जपणे समर्थन करत आहे. त्यांना शरम वाटायला हवी, असंही सावंत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

-“माढ्यातील काही मुलं गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला”

-मोदी साहेब… महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

-राहुल गांधी पंतप्रधान झाले तर…- आदित्य ठाकरे

तुमच्या वयाहून दांडगा पवार साहेबांचा अनुभव- सुप्रिया सुळे

-पक्षविरोधी भूमिका घेतल्याने काँग्रेसने केली ‘या’ नेत्याची पक्षातून हकालपट्टी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या