Top News

“नरेंद्र मोदींनी सामान्य जनतेवर ‘अन्याय’ केला, काँग्रेस पक्ष ‘न्याय’ करेल”

मुंबई |  संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. विविध राजकीय पक्ष जाहीर सभा घेईन एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात दावे प्रतिदावे पाहायला मिळतायेत.

गेल्या पाच वर्षांच्या काळात पंतप्रधानांनी सामान्य जनतेवर अन्याय केला आहे. आता काँग्रेस पक्ष न्याय करेल, असं ट्वीट महाराष्ट्र काँँग्रेसने केलं आहे.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच काँग्रेसने त्यांची महत्वकांक्षी ‘न्याय’ योजना जाहीर करून भाजपला एकप्रकारे शह दिला. विविध प्रचारसभांमधून राहुल गांधी न्याय योजना लोकांपर्यंत पोहचवत आहेत.

दरम्यान, गेल्या 60 वर्षांत काँग्रेसने देशासाठी काय केलं? असा प्रश्न भाजप विचारत आहे तर गेल्या 5 वर्षांत तुम्ही काय केलं? असा प्रश्न काँग्रेस विचारत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-“आचारसंहितेचं कारण सांगून शेतकऱ्यांना मदत नाही मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्या; गौडबंगाल काय?”

-मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळवले- मनसे

-आतिशी यांचा भाजपवर आक्षेपार्ह पोस्टर्स वाटल्याचा आरोप; दिल्लीच्या विद्यार्थीनींनी केला भाजपचा निषेध

-23 मे नंतर मी बारामतीत गुलाल उधळायला जाणार- चंद्रकांत पाटील

-अरविंद केजरीवालांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध केले तर मी फासावर जाईन- गौतम गंभीर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या