बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काॅंग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही”

मुंबई | भाजपला (BJP) विरोध करण्याच्या नादात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamta banarejee) यांनी महाविकास आघाडीत (MVA Alliance) कलगीतुरा रंगला आहे. ममता बॅनर्जी यांनी तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यात विविध राजकीय तसेच सामाजिक मान्यवरांच्या भेटी घेतल्या आहेत. या भेटीत त्यांनी काॅंग्रेसप्रणित युपीएबद्दल (UPA) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे.

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सध्या युपीए अस्तित्वात नाही, असं वक्तव्य केलं. यावरून राज्यात जोरदार वाद निर्माण झाला आहे. काॅंग्रेसशिवाय भाजपचा मुकाबला करण्याची कल्पना करणं म्हणजे भाजपला विरोध न करणं असं काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Spokpserson Nawab Malik) यांनी काॅंग्रेसला वास्तव स्विकारण्याचा सल्ला दिला होता. यावरून काॅंग्रेसकडून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. काॅंग्रेसला सल्ला द्यावा ऐवढी नवाब मलिक यांची पात्रता नाही, अशी घणाघाती टीका राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी केली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी सध्या विविध राज्यांमध्ये काॅंग्रेसला पर्याय उभा करण्याचं काम सुरू केलं आहे. परिणामी भाजपला विरोध करताना काॅंग्रेस आणि टीएमसीमधील वादाचा परिणामी राष्ट्रीय स्तरावरील राजकारणावर होणार आहे हे नक्की.

थोडक्यात बातम्या 

“मंत्रीच पायघड्या घालतात, ‘ती’ भेट घेऊन शिवसेनेनं महाराष्ट्र द्रोह केला”

‘या’ कंपनीच्या फोनचा मोठ्ठा स्फोट, ब्रँडचं नाव ऐकाल तर धक्काच बसेल

अवकाळी पावसाचा राडा, त्यातच हवामान खात्याकडून ‘या’ मोठ्या संकटाचा इशारा

कोणता झेंडा घेऊ हाती?, एक-दोन नव्हे तर ‘या’ नेत्याने केलं पाचव्यांदा पक्षांतर

महाराष्ट्रातील ‘या’ शहराचं टेंशन वाढलं, नायजेरियातून आलेल्या मायलेकी पॉझिटीव्ह

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More