बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीतील वाद शरद पवारांच्या दरबारात?; काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई | महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही सुरळीत असल्याचा दावा नेते आणि मंत्री करत आहेत. मात्र काहीतरी गडबड झाल्याचं दिसत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे.

काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाना पटोले यांच्याबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस आणि सेना, राष्ट्रवादीत यांच्या खटके पडत असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरू झाली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी सोमवारी मध्यस्थी केल्याचीही माहिती समोर आली होती. त्यानंतर देखील नाना पटोले यांनी खळबळजनक आरोप सरूच ठेवले.

महाविकास आघाडीमध्ये तणावावर वादावर वेळीच पडदा टाकण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. एच.के. पाटील यांनी सोमवारी प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात राज्यातील प्रमुख नेत्यांशी विचारविनिमय केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. या भेटी दरम्यान खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची हजेरी नव्हती. त्यामुळे काँग्रेसचेच नेते नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचं सांगितलं जातंय. एच. के. पाटील हे राहुल गांधी यांचे जवळीक मानले जातात. त्यामुळे आता दिल्ली दरबारात कोणता निर्णय होईल याकडे काँग्रेस कार्यक्रते वाट पाहत आहेत.

थोडक्यात बातम्या-

विद्यार्थ्यांना आता ‘या’ देशात शिकण्याची संधी; राज्यपालांच्या उपस्थितीत योजनेचा शुभारंभ

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

“चार मुलं असलेले भाजपचे खासदार रवी किशन लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडणार”

महत्वाची बातमी! पुण्यात सीरम इन्स्टिट्यूट तयार करणार रशियन कोरोना रस

खुशखबर! सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा तब्बल दहा हजार रुपयांनी उतरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More