पुणे | काँग्रेस पक्षाची भूमिका सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढणार आहे, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
सरकारने जनतेला मोठंमोठी आश्वासने दिली. खोटी स्वप्ने दाखवून जनतेची फसवणूक केली आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनजागृती करणे हे जनसंघर्ष यात्रेचे उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, 31 ऑगस्टला कोल्हापूर येथे अंबाबाईचा आशिर्वाद घेऊन यात्रेला सुरूवात होणार आहे. 7 सप्टेंबरला पुण्यात यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
-सनातन संस्थेच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा
-भारत-पाकिस्तानने चर्चेने प्रश्न सोडवावेत- इमरान खान
-… अन्यथा 1 डिसेंबरपासून पुन्हा मराठ्यांचं वादळ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
-मुंबईत आला तर सिद्धूचे हात पाय तोडू; भाजप नेत्याचा इशारा
-चिमुरड्याचा हा व्हीडिओ घालतोय लोकांच्या हृदयाला हात