बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसने आपल्या ‘त्या’ विधान परिषद उमेदवारांची नावं केली जाहीर

मुंबई | राज्यात विधानपरिषद निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. त्यातच काँग्रेस नाव आपल्या दोन उमेदवारांचे घोषणा केली आहे. कोल्हापूर विधान परिषद मतदारसंघातून सतेज पाटील तर धुळे-नंदूरबार मतदारसंघातून गौरव वाणी यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.

2014 साली कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सतेज पाटील विरुद्ध भाजपचे अमोल महाडीक अशी दुहेरी लढत पाहायला मिळाली होती, त्या निवडणुकीत महाडिकांनी सतेज पाटील यांचा पराभव केला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा भाजपने विधान परिषद निवडणुकीतही अमल महाडिक यांना सतेज पाटलांच्या विरोधात उमेदवारी दिल्याने पुन्हा ही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या गौरव वाणी यांच्याविरोधात अमरीश पटेल यांना भाजपने मैदानात उतरवलं आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रंगतदार होणार आहे. तसेच या निवडणुकीकडेच सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात सध्या 6 विधान परिषदेच्या जागेवर निवडणूक होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान 10 डिसेंबर रोजी होणार असून 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. विधान परिषद निवडणुका लागल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

‘द वाॅल’चा मास्टरप्लॅन तयार! न्यूझीलंडविरूद्ध ‘या’ रणनितीसह मैदानात उतरणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More