बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव, पटोलेंनी राजीनामा द्यावा”

नागपूर | नागपूर विधान परिषद जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीचा (Nagpur Legislative council Election) निकाल लागला आहे. या निवडणूकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा जोरदार विजय झाला आहे. त्यामुळे सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु आहे.

या निवडणूकीत भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandra shekhar Bawankule)  हे विजयी झाले झाले आहेत. 362 मते घेऊन बावनकुळे यांचा जोरदार विजयी झाला आहे. विजयानंतर बावनकुळे यांनी थेट काॅंग्रेसवर निशाणा साधला आहे.

काॅंग्रेसला त्यांच्या अंतर्गत वादामुळे पराभवाचा सामना करावा लागला असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं आहे. काँग्रेसला पक्षांतर्गत असलेल्या अस्वस्थपणाचा फटका बसला असून पटोलेंनी राजीनामा द्यावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली असल्याचं म्हणत बावनकुळे यांनी काॅंग्रसेवर टीकास्त्र सोडलं आहे. पटोलेंनी रा

दरम्यान, भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जोरदार विजयामुळे भाजपकडून त्याचं कौतुक करण्यात येत असून नागपूरमध्ये तर जल्लोषाचं वातावरण पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

अकोला विधान परिषद निवडणूक: अकोल्यातही भाजपचा झेंडा, महाविकास आघाडीला मोठा धक्का

‘मी दिल्लीतच आहे, माझ्यावर कारवाई करा’; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

नागपूर विधान परिषद निवडणूक: भाजपचा काॅंग्रेसवर दणदणीत विजय, बावनकुळे पुन्हा आमदार

धक्कादायक! म्हाडा पेपर फोडण्यासाठी ‘या’ खास कोडवर्डचा केला वापर

अजब लग्नाची गजब वरात! नवरदेवाला घेऊन घोडा फरार, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More