Top News विधानसभा निवडणूक 2019

काँग्रेसला मोठा धक्का; हा विद्यमान आमदार भाजपमध्ये जाणार!

धुळे | विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख निघून गेली. मात्र, राज्यात काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीय. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार अमरिश पटेल हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यानिमित्ताने सर्व राजकीय पक्ष प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 9 ऑक्टोबरला प्रचारासाठी शिरपूरमध्ये येत आहेत. यावेळी होणाऱ्या सभेत पटेल भाजपमध्ये प्रवेश करतील.

शिरपुरचे काँग्रेसचे आमदार अमरिश पटेल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी दिली होती. त्यामुळे अमरिश पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत हे तेव्हाच निश्चित झालं होतं.

दरम्यान, विधानसभा निवडणुका होण्यापूर्वीच काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसची राज्यातील स्थिती बिकट झाली असून काँग्रेससाठी राज्यातील अस्तित्वाची लढाई सुरु आहे.

महत्तावाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या