बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील घडामोडींमुळे काँग्रेस नाहक बदनाम; हायकमांड घेणार निर्णय!

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्रात तीन मोठ्या पक्षांचं मिळून सरकार स्थापित झालेलं आहे. त्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस या महत्त्वाच्या पक्षांचा समावेश आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या ‘लेटरबॉम्ब’ नंतर महाराष्ट्रातील सरकारवर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या सर्व प्रकरणामुळे काँग्रेस पक्षाची नाहक बदनामी होत असल्याचं पक्षश्रेष्ठींचं म्हणणं असल्याचं बोललं जात आहे.

आज दिल्लीतील हायकमांडने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून बैठक घेऊन याप्रकरणी एक अहवाल मागवला आहे. या अहवालावर राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे स्वतः निर्णय घेणार असल्याचंही सांगितलं जात आहे. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपानंतर सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. त्यामुळेच काँग्रेसच्या हायकमांडने आजच्या आज अहवाल मागवल्याचं कळतंय.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी तसेच कर्नाटकचे मंत्री एच.के पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील नेत्यांशी या प्रकरणात चर्चा केली आहे. तसेच एच.के पाटील यांनी काल एक पत्र जारी करून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही म्हटलं होतं. सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या नाहक बदनामीवर आता हायकमांड नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

सचिन वाझेंनी वापरलेली आणखी एक महागडी गाडी जप्त, ‘या’ कारणामुळे ही गाडी महत्त्वाची?

…म्हणून पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी क्षमा मागितली!

“स्वतःला वाघ म्हणवणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेत”

शरद पवारांना चुकीची माहिती देण्यात आली; फडणवीसांनी दाखवला पुरावा!

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर ‘डेटा बाॅम्ब’; पत्रकार परिषदेत केला मोठा खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More