बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चंद्रपूरमध्ये काँग्रेसला जोरदार झटका; मतदानाच्या दिवशीच बाप-लेकाला अटक

चंद्रपूर | नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं पहायला मिळालं होतं. अशातच आता नगरपंचायतीसाठी निवडणुकीसाठी मतदान प्रकिया पार पडत आहे. चंद्रपुरात देखील आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अशातच आता निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागल्याची माहिती समोर आली आहे. (Congress’ Vijay Bawne and Nitin Bawne arrested)

ऐन निवडणुकीत भाजपच्या जिल्हा महामंत्र्याच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर चंद्रपुरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर भाजपने पोलिसात तक्रार केली होती. काँग्रेसच्या विजय बावणे आणि नितीन बावणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली होती. त्यानंतर आता या पिता पुत्रांना अटक करण्यात आली आहे.

एकीकडे भंडाऱ्यात नाना पटोले यांच्याविरोधात बंडखोरी करण्यात आली आहे. तर चंद्रपुरात भाजपने काँग्रेसचा पत्ता कट केलाय. त्यामुळे आता या दोन्ही घटना काँग्रेससाठी मोठा असल्याचं मानलं जातंय. चंद्रपुरात 6 नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे.

दरम्यान, द्रपुरात आजी-माजी पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चंद्रपुरात माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात मुकाबला पहायला मिळतोय. त्यामुळे आता चंद्रपूरात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

iphone 13 सिरीजवर मिळतेय ‘इतक्या’ हजार रुपयांची सूट, जाणून घ्या ही बंपर ऑफर

ओबीसी आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार उचलणार ‘हे’ मोठं पाऊल

महाराष्ट्र गारठणार! येत्या 24 तासात कडाक्याची थंडी, तज्ज्ञांचा इशारा

धक्कादायक! ‘या’ महिला सरपंचावर आली चक्क भीक मागण्याची वेळ

कोरानाचा परिणाम आता स्पर्म काऊंटवर? संशोधनातून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More