बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

मुंबई | काँग्रेसचे महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन झालं आहे. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत मध्यरात्री 12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून माणिकराव जगताप यांच्या निधनाचं वृत्त देण्यात आलं आहे. आज दुपारी 2 वाजता महाडमध्ये माणिकराव जगताप यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या अकस्मित निधनाचं वृत्त धक्कादायक असून काँग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावलं आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असं ट्विट महाराष्ट्र काँग्रेसने केलं आहे.

दरम्यान, माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती.

थोडक्यात बातम्या-

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज फेल; टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं”

भविष्यात कोरोनाचे आणखी व्हेरिएंट येण्याची शक्यता, त्यामुळे…- डॉ. रणदीप गुलेरिया

मुख्यमंत्री आज सातारा दौऱ्यावर; पुरग्रस्त भागाची पाहणी करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More