Top News देश

‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली |  काँग्रेसने सुभाषचंद्र बोस यांना मृत्यूच्या दाढेत पाठवलं होतं. माझा आरोप आहे की काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे  खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे. जनसभेला संबोधित करताना साक्षी महाराज बोलत होते.

नेताजींचं हे बलिदान देश कधीच विसरू शकत नाही. त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं. मात्र, इतिहासाने त्यांचं शौर्य, धाडस आणि पराक्रम दाबून ठेवण्याचं काम केलं आहे, असा दावाही साक्षी महाराज यांनी केला आहे.

सुभाषचंद्र बोस यांच्या लोकप्रियतेपुढे पंडित नेहरू आणि महात्मा गांधीही फिके पडत होते. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप साक्षी महाराज यांनी केला.

दरम्यान, रक्त सांडवून आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं आहे. स्वातंत्र्य मागितलं आणि ब्रिटिशांनी ते दिलं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी सुभाषबाबूंना तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुँगाचा नारा द्यावा लागला असल्याचंही साक्षी महाराज म्हणाले.

 

थोडक्यात बातम्या-

“एक दीड वर्षापासून आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या अंगात यायला लागलं”

अनैतिक संबंधांमध्ये पैसा पडला फिका; प्रियकरानं प्रेयसीचा जीवच घेतला!

सुंदर मुली दाखवायच्या अन्… तुमच्यासोबतही हा प्रकार घडत असेल तर सावधान; पोलिसांचं आवाहन

“श्री राम नाव घेतल्यानं काहींना राग का येतो?”

‘आम्हीही याच देशाचे, ओबीसी जनगणनेची आवश्यकता’; पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करून दिली आठवण

सासरवाडीला बोलावत 25 वर्षांच्या जावयाची हत्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या