फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस मैदानात, 1 नोव्हेंबरला मूकमोर्चा

मुंबई | मुंबईत फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून पेटलेलं राजकारण आणखी भडकण्याची शक्यता आहे.

1 नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी दादरमध्ये काँग्रेसकडून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी ‘फेरीवाला सन्मान मोर्चा’ काढण्यात येईल.

दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र तेही सध्या दहशतीखाली आहेत. अशा मराठी फेरीवाल्यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय.