काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!
मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर काँग्रेसन एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण यांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचं अध्यक्ष बनवलं आहे. आता पृथ्वीराज चव्हाणही G-23 नेत्यांच्या यादीत असणार आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांना स्क्रिनिंग कमिटीच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी देऊन काँग्रेस नेत्यांकडे दुर्लक्ष करत नाही, असा संदेश देत असल्याची चर्चा राजकीय वर्तळात सुरू आहे.
आसाममध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. 27 मार्चला येथे मतदान होणार आहे. येथे एकूण तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. अशातच काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांना आसामच्या स्क्रिनिंग कमिटीचे अध्यक्ष बनवलं आहे. आसामनिवडणुकीचा निकाल 2 मेरोजी लागणार आहे. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 31 मे रोजी संपत आहे.
दरम्यान, राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर काँग्रेसचे जेष्ट नेते गुलाम नबी आझात सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. 27 फेब्रुवारीला गुलाम नबींच्या नेतृत्वात काँग्रेसचे G-23 म्हटले जाणारे नेतेही एकत्र आले होते.
थोडक्यात बातम्या-
“मोदींना आणि योगींना मुलं नाहीत ते काय कुणाला देऊन जातील”
मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या मुलाला झाली कोरोनाची लागण
अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळत नाही- पंकजा मुंडे
सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी
“हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली”
Comments are closed.