देश

गुजरातमधील कोरोनासंदर्भात हार्दिक पटेल यांचा धक्कादायक आरोप

गांधीनगर | काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी गुजरात सरकारवर गंभीर आरोप केले आहे. गुजरात सरकारने मुद्दाम कोरोना चाचण्या कमी केल्याचा धक्कादायक आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे.

मोदींचं हे खोटे गुजरात मॉडेल आहे. गुजरात कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचू नये त्यामुळे गुजरात सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या कमी केली, असं हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे.

खोटं बोलून भाजपने माझ्या भारताला फसवलं आहे. गुजरात आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात 33 हजार 316 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 2407 लोकांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे, असं हार्दिक पटेल यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या अहमदाबादमध्ये करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तिथे 12 हजार 611 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 1501 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

जामखेडमध्ये 11 रुग्ण ऐकून माझं मन सुन्न झालं, रात्रभर झोप आली नाही- राम शिंदे

प्रामाणिक पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अस्वस्थ झाले- आशा भोसले

“उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्याचीच चाल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या