बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी सरकार राहुल गांधींना घाबरतंय”

मुंबई | गेल्या आठवड्यात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट ट्विटरने निलंबीत केलं होतं. त्यानंतर ट्विटरने कारवाईचा सपाटाच लावला आहे. ट्विटरने आणखी मोठी कारवाई करत काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवर कारवाई केेली आहे. तर त्यानंतर आता राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अकाऊंटवर देखील कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

दिल्लीतील आत्याचार पिडीत कुटूंबियांची राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. त्यानंतर त्या भेटीचे फोटो त्यांनी ट्विटर अकाऊंटवर टाकले होते. त्यानंतर राहुल गांधी यांचं अकाऊंट निलंबीत करण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेस नेत्यांनी ट्विटर आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकार राहुल गांधीसे डरती है, ट्विटर को आगे करती है, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यांनी ‘मै भी राहुल’ आणि राहुल गांधी यांनी टाकलेला तो वादगस्त फोटो ट्विट केला. त्यानंतर ट्विटर त्यांच्यावर देखील कारवाई करत अकाऊंट लाॅक केलं आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी माध्यांसमोर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

नागरिकांच्या विचारांची गळचेपी सरकार करत असल्याची टीका बाळासाहेब थोरातांनी केली आहे. या देशात आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. लोकशाहीमध्ये मुस्कटदाबी चालली आहे. ट्विटरने भाजपच्या दबावाखाली काम करणं योग्य नाही, असं मत देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी ! राज्य सरकारचा यु-टर्न; शाळा सुरू करण्याचा निर्णय अखेर रद्द

पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट पैसे; जाणून घ्या अधिक माहिती

“राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेस संघटनात्मक पातळीवर कमी पडली”

“महाराष्ट्राचा पंंतप्रधान झाला पाहिजे, असं मला अजिबात वाटत नाही”

“आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर आपला स्वतःचा फोटो आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More