बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडी सरकार अडचणीत?; काँग्रेसमुळे टेंशन वाढलं

मुंबई | काँग्रेस हायकमांडने (Congress High command) उद्या महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलवली आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत आहे, असा आरोप काही काँग्रेस मंत्र्यांचा आहे.

काँग्रेसच्या विषयांबाबत दोन्ही मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळालेली नाही, अशी महाराष्ट्रातील काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे. यामुळे आता आघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महाविकास आघडीमध्ये काँग्रेस (Congress) राहणार की जाणार? यासाठी उद्या दिल्लीत फैसला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि छत्रपती संभाजीराजे (sambhajiraje) यांच्यात संघर्ष पाहण्यास मिळाला. पण, आता काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून राज्याबाहेरील व्यक्तीला संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

“केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती भाजपवाल्यांना कशी मिळते?”, सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल

मोठी बातमी! भाजपकडून राज्यसभा उमेदवारांची नावे जाहीर

आनंदाची बातमी! मान्सून केरळमध्ये दाखल; राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

“आमच्या बापाची बदनामी होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही”

मोठी बातमी! राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल, ‘हे’ कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More