बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर आम्ही कोर्टात जाऊ’; नाना पटोलेंचा शिवसेनेला गंभीर इशारा

नागपूर | मुंबई महापालिका निवडणुकासाठी निवडणूक आयोगानं जुन्या 227 सदस्यांच्या संख्येत वाढ करत 236 सदस्य संख्या आणि प्रभाग सीमारेषांची अंतिम अधिसूचना जारी केली. मात्र, नव्या रचनेनुसार काँग्रेसला 10 ते 15 जागांवर फटका बसण्याची शक्यता आहे.

यानंतर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) धूसफूस आणखी एकदा चव्हाट्यावर आली आहे. महाविकास आघाडीतील काही पक्ष आपल्या सोयीने प्रभाग पाडत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

तीन पक्षांचं सरकार आहे तेव्हा सगळ्या पक्षांचं मत विचारात घेऊन वॉर्ड रचना व्हायला हवी. महाविकास आघाडीतील काही पक्ष आपल्या सोयीने प्रभाग पाडत आहेत. तसं असेल तर आम्ही कोर्टात जाणार आहोत, असा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेत राष्ट्रवादीचा (NCP) फायदा होईल व मुंबई महापालिकेत शिवसेनेचा (Shivsena) फायदा होईल अशा पद्धतीने प्रभागरचना करण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा कुठलाही विचार करण्यात आला नसल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादीवर नाराज असल्याचा चर्चा सध्या रंगल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

तृप्ती देसाईंची रूपाली चाकणकरांवर खोचक शब्दात टीका, म्हणाल्या…

मोठी बातमी! राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द, ‘हे’ मोठं कारण आलं समोर

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली, संजय राऊतांच्या वक्तव्याने खळबळ

केतकी चितळे प्रकरणाला नवं वळण, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

‘आम्ही चवन्नी छाप, भाडोत्री लोक ठेवणार नाही तर…’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More