बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘काँग्रेस एकला चलो साठी सुद्धा तयार’; ‘या’ काँग्रेस खासदाराचं मोठ वक्तव्य

नवी दिल्ली | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांनी नुकतंच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आता काँग्रेस खासदार कुमार केतकर (Congress MP Kumar Ketkar) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

कुमार केतकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते, यावेळी ते म्हणाले, तिसरी आघाडी कोणाच्याही नेतृत्वात होऊ शकते. ममतानां तसं वाटत असेलं तर त्यांनी तसं करावं. काँग्रेस एकला चलो रे साठी सुद्धा तयार आहे, असं सांगून ते पुढे, आम्ही तृणमूलला सोबत बोलवणार आहोत. पण ते नाही आले तरी फरक पडत नाही, असंही म्हणाले आहेत.

ते बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबद्दल बोलत होते. यावेळी तिसरी आघाडीबद्दल विचारलं असता ते म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही. मात्र उद्या त्यांच्या लक्षात आलं की काँग्रेस खूप क्षीण झाली आहे तर ते काँग्रेसशिवाय दुसरी आघाडी करतीलही,’ अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी सध्या मुंबई दौऱ्यावर असून त्या आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीत काहीतरी मोठी राजकीय चर्चा होणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पर्याय निर्माण करण्याची गरज असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. त्याच दृष्टीने ही भेट असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईसाठी एकहाती सामने जिंकणाऱ्या पांड्या बंधूंचा पत्ता कट; वाचा रिटेन खेळाडूंची यादी

केंद्राच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

‘किती लोकांना भरपाई देण्यात आली त्याची माहिती दिली नाही’; सर्वोच्च न्यायालयाने ९ राज्यांना झापलं

लगीन घाई बरी नाही! नवरा-नवरीच्या फजितीचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

ओमिक्रॉन विषाणूने जगाचं टेन्शन वाढवलं, रूग्णसंख्येबाबत धक्कादायक माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More