“काँग्रेस बुडणार राजघराणं; त्यांना वाचवण्यासाठी आणखी किती खोटं बोलणार”

“काँग्रेस बुडणार राजघराणं; त्यांना वाचवण्यासाठी आणखी किती खोटं बोलणार”

नवी दिल्ली | काँग्रेससारख्या  बुडणाऱ्या राजघराण्याला वाचवण्यासाठी आणखी किती खोटं बोलावं लागणार आहे?, अशा शब्दात केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

जगभरातील लोकशाहीत जे लोक खोटेपणाच्या आधारे पुढं जाण्याचा प्रयत्न करतात शेवटी ते स्वत:च सामाजिक जीवनातून गायब होतील, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. 

भारत हा सर्वात जुन्या काळातील पक्षाच्या जाळ्यात फसला आहे. काँग्रेसचे नेते गांधी घराण्याबाबत चांगले किंवा वाईट बोलू शकत नाहीत. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे, असंही ते बोलले आहेत. 

राफेल करारात जनतेचे हजारो कोटी रुपये वाचले आहेत. पण त्याला बदनाम करण्यासाठी रोज खोटं बोललं जात आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. 

महत्वाच्या बातम्या-

उत्तर प्रदेशात सोमवारचा दिवस प्रियांका गांधींचा तर आजचा अखिलेश यादवांचा

सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका- निलेश राणे

काँग्रेस खासदारांकडून ‘फेकु बँके’च्या 15 लाखांच्या नकली चेकचं वाटप

भाजप आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं- अजित पवार

लखनऊमधून प्रियांका गांधी थेट रॉबर्ट वाड्रांच्या भेटीला

Google+ Linkedin