बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेस पक्ष म्हणजे टायटॅनिकचं जहाज, तो बुडतच चाललाय”

नवी दिल्ली | 2014च्या लोकसभा निवडणूकीनंतर काँग्रेसला उतरती कळा लागली आहे. 2019च्या लोकसभा निवडणूकीत देखील काँग्रेसला उभारी घेता आली नाही. काँग्रेसच्या हातातून अनेक राज्य निसटली आहेत. मधल्या काही काळात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कमबॅक करण्यात किंचित यश आलं होतं, परंतू नंतर राहूल गांधी यांचं नेतृत्व देखील फोल ठरलं. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यानं काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

एखाद्या पक्षाची ओळख म्हणजे त्याची विचारधारा आणि नेतृत्व असतं. भारतीय जनता पक्षाची विचारधारा स्पष्ट आहे आणि आमचं नेतृत्व म्हणजे मोदीजी देशातच नव्हे तर जगभरातलं सर्वात खंबीर नेतृत्व आहे. पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर काँग्रेस पक्ष हा टायटॅनिकच्या जहाजासारखा आहे. तो बुडतच चालला आहे, अशी टीका भाजप नेते आणि प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली आहे.

काँग्रेस पक्ष बुडणार तर आहेच तो कारण राहुल गांधींच्या परिवाराव्यतिरिक्त जर कोणी उठून दिसू लागला तर त्याला दाबून टाकलं जातं. म्हणूनच पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू, तर राजस्थानात अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट आणि समाजवादी पार्टी तर एकाच परिवारातल्या सदस्यांनी तयार झालेली आहे, असंही गौरव भाटिया म्हणाले.

दरम्यान, मुकुल रॉय यांच्याबद्दल मी म्हणेन की येथेही फरक आपल्याला दिसून येतो. जेव्हा जितिन प्रसाद काँग्रेस सोडून जातात तेव्हा मध्यप्रदेशातली काँग्रेसची शाखा म्हणते की, तो कचरा होता, कचरापेटीत गेला. पण जेव्हा मुकुल रॉय सोडून गेले, तेव्हा आम्ही अशा प्रकारचं कोणतंही विधान केलं नाही, असं स्पष्टीकरण गौरव भाटिया यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लपत छपत येत महिलेवर हात उचलण्यात कसला आलाय पुरूषार्थ?- चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार- किरीट सोमम्या

मनसुख हिरेन प्रकरणात नवं वळण; एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचा छापा

“…तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावं लागेल”

…तरच मराठ्यांना आरक्षण मिळेल- प्रकाश आंबेडकर

‘…तर लशीचाही फारसा काही उपयोग होणार नाही’; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More