Top News महाराष्ट्र मुंबई

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच, या नेत्याची होऊ शकते निवड!

मुंबई | विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोलेंनी राजीनामा दिला आहे. मात्र विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार आहे. नाना पटोलेंच्या जागी काँग्रेसच्या नेत्याची निवड होणार असल्याने नेमकं कोणाला विधानसभा अध्यक्षपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून सुरेश वारपूडकर, अमीन पटेल आणि आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी हा नाव चर्चेत आहेत. मात्र यामधील केसी पाडवी हे नाव आघाडीवर असल्याची माहिती समजत आहे.

केसी पाडवी हे अक्कलकुव्या मतदारसंघातील आमदार आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी अनेक मंत्रिपदाचा कारभार सांभाळला आहे. त्यामुळे काँग्रेस कोणत्या नेत्याला विधानसभा अध्यक्षपद देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरमयान, नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यपद पद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा काँग्रेसने केली नाही.

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि स्मारक न बांधणं याला टाईमपास बोलतात”

“जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची”

महाविकास आघाडीत वादाचा नवा मुद्दा; ते पद आता कुणाकडे जाणार?

“आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने करभार करतोय, विरोधकांनी लावालावी करू नये”

तात्या विंचूला जिवंत करणारे ‘बाबा चमत्कार’ काळाच्या पडद्याआड

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या