बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आवाज दाबण्याचं काम जर होत असेल तर..”; अशोक चव्हाणांचा मोदी सरकारला इशारा!

मुंबई | मागील जवळपास दहा महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे सध्या केंद्र सरकारच्या या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अलिकडील लखीमपूर खीरी घटनेवरूनही शेतकऱ्यांचा रोष केंद्र सरकारवर आहे. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

मागील अनेक महिन्यांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकरी आंदोलने होत आहेत. परंतु केंद्र सरकार शेतकऱ्यांची बाजू समजून घ्यायला तयार नाही. केंद्र सरकारने लोकाभिमुख निर्णय घेण्याची गरज आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम जर होत असेल तर ते कदापी लोकांना सहन होणार नाही. याचा प्रतिकार वेगळ्या पद्धतीने केल्याशिवाय लोक राहणार नाहीत, असा सूचक इशारा अशोक चव्हाण यांनी मोदी सरकारला दिला.

सोमवारी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे. माझी लोकांना विनंती आहे,की शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा जो प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांचा निर्णय घेण्यासंदर्भात केंद्र सरकार चालढकल करत आहे. आपल्याला शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आपल्याला उद्याचा बंद करायचा आहे, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खीरी या ठिकाणी झालेल्या घटनेवरून आघाडी सरकारने बंद पुकारला आहे.

थोडक्यात बातम्या-

खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

फाजिल आत्मविश्वास नडला; सर्वांनी पाहिली तरंगणारी कार, पाहा व्हिडीओ

देशातील कोरोना लसीकरणाने गाठला विक्रमी टप्पा; पण राज्यांमध्ये मात्र वेग मंदावला

काळ्या फिती लावू, परंतु दुकाने सुरूच ठेवणार! महाराष्ट्र बंदला ‘या’ जिल्ह्यात विरोध

“सकाळी 6 ते रात्री 11 अजितदादांच्या कामाचा धडाका, डिपॉझिट उगीच जप्त होत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More