Top News महाराष्ट्र मुंबई

“देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचं बोलतात. आत्ता अलीकडेच त्यांनी आम्ही फासा पलटवणार असं म्हटलं होतं. यावरून काँग्रेस नेते आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. याआधीच्या 7 दिवसात, 1 महिन्यात आणि 1 वर्षात सरकार पाडण्याच्या दाव्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलं असल्याचं म्हणत भाई जगतापांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृवावर विश्वास दाखवून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आहे. ते सरकार पडणार नसल्याचं भाई जगताप यांनी म्हटलं आहे. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात पदयात्रा काढण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान,  महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या हस्ते पदयात्रेचं उद्घाटन करण्यात आलं. सायन कोळीवाडा प्रतीक्षा नगर येथील शिवाजी चौकात उद्घाटन पार पडलं.

थोडक्यात बातम्या-

भाजपला आणखी एक झटका,’या’ माजी आमदाराने उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

गॅस दरवाढीची मोदींच्या दाढीशी सुरू असलेली स्पर्धा थांबवा- रूपाली चाकणकर

‘या’ तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या, अन्यथा…- राकेश टिकैत

“राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये”

“कोरोनाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात”‘महाराष्ट्रात चार उपमुख्यमंत्री करा’; बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या