बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेस नेत्याने अग्निपथ योजनेशी जोडला शिंजो आबेंच्या मृत्यूशी संबंध, म्हणाले…

नवी दिल्ली | जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची काल ऐका प्रचारसभेदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. टेटसुयो यमागामी या 40 वर्षीय नागरीकाने घरघुती बनावटीच्या पिस्तुलाने गोळ्या चालवत त्यांची हत्या केली. टेटसुयो यमागामी हा 2005 सालापर्यंत जपानच्या मरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये कार्यरत होता. तो शिंजो अबे यांच्या कामकाजावर नाराज असल्याने त्याने त्यांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

आता काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी शिंजो अबे यांच्या हत्येचा संबंध थेट केंद्रस रकारच्या अग्निपथ योजनेशी जोडला आहे. राजपूत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला. “शिंजो अबे यांना गोळी मारणारा यामागामी हा जापानच्या एसडीएफ म्हणजे विनापेन्शनवाल्या सैन्यात कार्यरत होता.” असे ट्विट राजपूत यांनी केले. तर त्यांच्या या ट्विटवरून भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनी त्यांच्यावर टिका केली आहे.

काँग्रेसच्या अधिकृत प्रवक्त्याने आपले घाण्यारडे राजकारण साधण्यासाठी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्या आकस्मित निधनाची निवड केली आहे. काहीतरी मर्यादा ठेवा. तसेच सोनिया आणि राहुल गाधी यांनी या निर्दयी व्यक्तीला पदावरुन हटवले तर मला आश्चर्यच वाटेल, असं पूनावाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारत सरकारची अग्निपथ योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उत्तरेकडील राज्यातील तरुणांनी या योजनेला विरोध केला आहे. काही दिवसांपुर्वी दंगल, जाळपोळ आदी घटना याठिकाणी घडल्या होत्या. या योजनेत तरुणांना 4 वर्षाच्या करारावर सैन्यात भरती केले जाणार होते. त्यानंतर त्यांना निवृत्ती देण्यात येणार होती. निवृत्तीवेळी त्यांना 11 लाख रक्कम मिळणार होती. थोडक्यात, त्यांना कायमस्वरुपी नोकरी मिळणार नव्हती. त्यामुळे या योजनेला विरोध केला जातो आहे. टेटसुयो यमागामी हा सुद्धा अशाच ऐका योजनेचा बळी असल्याने त्याने पंतप्रधानांची हत्या केली असे राजपूत सुचवू ईच्छित होते.

 

 

थोडक्यात बातम्या –

अमरनाथमध्ये ढगफुटी; आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू

‘खाली काही घातलं की नाही?’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल

‘मी व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलाय, रिस्क असते पण…’; रणवीरने सांगितला तो किस्सा

अभिनेता सुमीत राघवनने महाराष्ट्र सरकारला केली विनंती, म्हणाला…

राज्यातील ‘या’ भागांना रेड अलर्ट जारी, पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More