Congress | एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्तीसगढमधील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने (Congress leader) पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्लं आहे. उपचारादरम्यान या चौघांचाही मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंबाने जीवन का संपवले? याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने संपवलं आयुष्य
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय 65, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक 10) यांनी त्यांच्या पत्नी आणि 2 मुलांसमवेत विष खाल्लं आहे. एसपी राजेंद्र जयस्वाल म्हणाले, पंचराम यादव यांनी त्यांची पत्नी नांदणी यादव (वय 55), मुलगा सूरज यादव (वय 27) आणि निरज यादव (वय 32) यांच्यासमवेत विष प्राशन केलं.
याबाबत कोणाला माहिती मिळू नये यासाठी नेत्यासह कुटुंबियांनी घरा बाजूचे दोन्ही गेट बंद केले होते. दोन्ही बाजूंनी कुलुप लावले आणि तिसऱ्या ठिकाणी आतून कुलुप लावत त्यांनी आत्महत्या केली आहे.
एक मुलगी त्यांच्या घरी गेली, तेव्हा याबाबतचा खुलासा झाला. सातत्याने आवाज देऊनही कोणीही दरवाजी उघडत नव्हते. त्यामुळे तिला संशय आला आणि तिने आजूबाजूच्या इतर लोकांना याबाबतची माहिती दिली.
पंचराम यादव काँट्रॅक्टरचे काम करत होते. त्यांनी दोन बँकांकडून 40 लाखांचे लोन घेतले होते. शिवाय त्यांना ह्रदयाशी निगडीत आजारही होता. शिवाय पंचराम यादव यांच्या पत्नी कर्करोगाशी झुंज देत होत्या.
मुलगा निरज यादव खासगी कंपनीत नोकरी करत होता. तर दुसरा मुलगा वडिलांप्रमाणे काँट्रॅक्ट घेत होता. आता पोलिसांकडून घर सील करण्यात आले असून चौकशी सुरु करण्यात आली आहे. पंचराम यादव यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचा पोलीस तपास करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप; दादांचं टेंशन वाढलं!
‘मी कपडे बदलताना…’; अभिनेत्रीच्या गंभीर आरोपानं खळबळ
पायाला दुखापत असतानाही शरद पवार अनवाणी पायाने जोडे मारो आंदोलनात सहभागी!
पुण्यात नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा, कारण ऐकून धक्का बसेल
लाडकी बहीण योजना बंद होणार?; अजित पवारांचं मोठं वक्तव्य