Top News देश

“राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याचा अशुभ मुहू्र्त म्हणूनच अमित शहांना अन् मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोना”

नवी दिल्ली |  सनातन धर्म आणि हिंदू परंपरेचे उल्लंघन केल्यामुळेच गृहमंत्री अमित शहा तसंच राम मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांसह अन्य पुजाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, असा अजब दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

देशात राम मंदिर भूमीपूजनाची जय्यत तयारी सुरू आहे. अयोध्येत मोठी लगबग पाहायला मिळतीये. अशातच गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यावर बोलताना हिंदू धर्माचं उल्लंघन केल्यानेच अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचं दिग्विजय सिंह म्हणाले.

दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत हिंदू धर्माचं पालन न केल्याने भाजपच्या नेत्यांना कोरोना झाल्याचा अजब दावा केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, “राम मंदिरांच्या पुजाऱ्यांना कोरोना… उत्तर प्रदेशच्या मंत्री कमल राणी यांचा कोरोनाने मृत्यू… अमित शहा यांना कोरोनाची लागण होऊन इस्पितळात भरती, हे सगळं झालंय भाजप नेत्यांनी हिंदू धर्माचं उल्लंघन केल्याने”

पुढे बोलताना दिग्विजय सिंह यांनी म्हटलंय, “अशुभ मुहूर्तावर राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा करून पंतप्रधान मोदीजी आपण आणखी किती जणांना रूग्णालयात पाठवणार आहात?”

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

‘बाॅयकाॅट चायना’ म्हटलं तर ते आत्महत्या केल्यासारखं होईल- रघुनाथ माशेलकर

“अमित शहा यांना जरी कोरोना झाला असला तरी गेहलोत सरकारवरील धोका कायम आहे”

महाराष्ट्राची आणखी एक संस्था गुजरातला हलवली, दुर्दैव म्हणजे राजकारण्यांनी ब्र देखील काढला नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या