बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महागाईविरोधात काँग्रेसचा मुंबईत मोर्चा, घोषणा देत असताना नेते बैलगाडीवरून कोसळले; व्हिडीओ व्हायरल

 मुंबई | मोदी सरकारने निर्माण केलेल्या महागाईविरोधात काँग्रेस नेत्यांनी 8 जुलैपासून राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेस नेते राज्यभरात मोदी सरकारविरोधात वेगवेगळी आंदोलनं करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या इंधनांच्या दरांविरोधात आज मुंबईत देखील काँग्रेस नेत्यांनी बैलगाडीतून मोर्चा काढला.

या मोर्चादरम्यान काँग्रेस नेत्यांबरोबर काही कार्यकर्ते देखील बैलगाडीत चढले होते. यामुळे बैलगाडीवर प्रचंड वजन वाढल्याने ती कोसळली आणि बैलगाडीत असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेस नेते जमिनीवर कोसळले. या आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासोबत अन्य नेते देखील सहभागी झाले होते.

दरम्यान, महागाईच्या मुद्यावरुन काँग्रेसने भाजपला धारेवर धरलं आहे. मोदी सरकारने केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती.

8 जुलै रोजी नाना पटोले यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाने सायकल यात्रा काढून इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविला होता. या सायकल यात्रेत पटोले यांच्यासह उर्जामंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार हे देखील सहभागी झाले होते.

पाहा व्हिडिओ –

थोडक्यात बातम्या –

”त्या’ साखर कारखान्यांची यादी पाच वर्षापुर्वी अण्णा हजारेंनी केली’; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

मुंबईत सलग 3 दिवस लसीकरण बंद, नागरिकांची गैरसोय; BMC म्हणते…

नाना पटोलेंच्या फोन टॅपिंग प्रकरणावरून वाद पेटला, अजित पवार म्हणाले…

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या!

सातारा जिल्हा बँक ईडीच्या रडारवर; जरंडेश्वर प्रकरणात सातारा जिल्हा बँकेला नोटीस

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More