मुंबई | काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार जयप्रकाश छाजेड (Jayaprakash Chhajed) यांचं निधन झालं आहे. काल रात्री उशीरा त्यांचं निधन झाले आहे. ते 75 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे नाशिक परिसरात शोकाकुल वातावरण आहे.
ह्रद्यविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णायात दाखल करण्यात आलं होत. उपचाऱ्यादरम्यान त्याचं निधन झाल्याचं समोर आलं होत. काँग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते म्हणून त्यांचा नावलौकीक होता.
दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण(Yashwantrao Chavan) यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. काँग्रेस पक्षाशी त्यांचं कुटुंब नेहमीच एकनिष्ठ राहिल्याचं सांगितलं जातं.
नागपूर (Nagpur) येथे काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी जाण्यास निघाले होते. त्याचवेळी त्यांची तब्येत खालावली त्याचवेळी त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
महत्त्वाच्या बातम्या