देश

काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य हवं आहे; काँग्रेस नेत्याची मुक्ताफळं

श्रीनगर | ‘स्वातंत्र्य मिळवणे हे काश्मीरच्या जनतेचं पहिलं प्राधान्य आहे. मात्र काश्मीरशी संबंधित देशांमुळे काश्मीरला स्वातंत्र्य मिळणं कठिण झालं आहे, असं वक्तव्य जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोझ यांनी केलं आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. 

काश्मीरमधील जनतेला ना भारतासोबत राहायचं, ना पाकिस्तानसोबत त्यांना स्वतंत्र राहायचं आहे. त्यावर आपण फक्त जनतेच्या मनातले बोलत असल्याचे सांगत त्याचा आणि पक्षाचा काही संबंध नसल्याचेही सोझ यांनी सांगितलं. 

दरम्यान, पाकिस्तानच्या परवेज मुशरफ यांनी केलेल्या विधानाचे सोझ यांनी समर्थन केल्याने त्यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात नाराजीचे सूर उमटत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-राहुल गांधी मंदबुद्धी; भाजप खासदार सरोज पांडे यांचं वक्तव्य

-विखे-पाटील द्विधा मनस्थितीत; समजेना कोणत्या पक्षात जावे!

-अभिनेत्री काजोल चालता चालता पडली; पहा व्हायरल व्हीडिओ

-भाजप आमदाराच्या घरी प्रेयसीचा राडा; म्हणाली, “मी तुला सोडणार नाही!”

-प्रकाश आंबेडकर कुठेही गेले तरी मतदार मात्र भाजपसोबत राहतील!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या