नवी दिल्ली | शरद पवारांमुळे काँग्रेसच्या नेत्यांमधील चर्चा वादळी ठरल्याचं कळतंय. काँग्रेसचे नवे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या समोरच हा प्रकार घडला.
खरगे यांची महाराष्ट्र प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरुन काँग्रेसच्याच नेत्यांमध्ये दोन गट पडलेले पहायला मिळाले.
शरद पवारांचा काही भरवसा नाही. सध्या ते राहुल गांधींच्या पंतप्रधानपदाला विरोध करत आहेत. सोनिया गांधींच्या विदेशी नागरित्वाचा मुद्दा त्यांनीच उकरुन काढला होता. त्यामुळे आगामी काळात ते राहुल गांधींना दगाफटका करणार नाही कशावरुन?, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
-व्हॉट्सअॅपच्या ग्रुप अॅडमिनला जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी सक्तीची
-विरोधकांनी शरद पवारांपासून सावध रहायला हवं- शिवसेना
-एकदा हे राज्य हातात देऊन तर बघा, कोणी रडताना दिसणार नाही- राज ठाकरे
-भारताला बुलेट ट्रेनची गरज नाही, रेल्वेला सक्षम करा- मेट्रो मॅन
-ट्रोल झाल्यानं सुषमा स्वराज दुःखी; ट्विटरवर घेतला पोल