देश

मजुरांनंतर आता राहुल गांधी यांनी केली टॅक्सी चालकाशी चर्चा

नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिल्लीत एका टॅक्सी चालकाशी चर्चा करत त्याच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधी या टॅक्सी चालकाशी रस्त्याच्या कडेला खुर्चीवर बसून चर्चा करत असल्याचं दिसत आहे. राहुल गांधी आणि टॅक्सी चालकाने चेहऱ्याला मास्क लावलेला फोटोत दिसत आहे.

लॉकडाउनमुळे देशभरातील टॅक्सी चालकांना समस्यांचा सामना करावा लागला आहे. सपूर्ण देशभरातील वाहतूक ठप्प झालेली होती. त्यानंतर टॅक्सी मालक आणि चालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदतीची मागणी केली होती.

लॉकडाउन-4 मध्ये टॅक्सी आणि कॅब अॅग्रिगेटर्सना काही अटींसह काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, स्थिती सामान्य होण्यासाठी आणखी बराच कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या पूर्वी राहुल गांधी यांनी 16 मे या दिवशी दिल्लीतील सुखदेव विहार येथील उड्डाणपूलाजवळ स्थलांतरित मजुरांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी फुटपाथवर बसून मजुरांशी चर्चा केली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली केरळ सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मदत

कामगारांच्या मदतीला अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली

महत्वाच्या बातम्या-

आमच्या विरोधात काही करण्याची हिंमत केली तर…; पाकिस्तानची भारताला धमकी

पियुषजी, राज्यसभेत आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय विसरु नका- संजय राऊत

…म्हणून शरद पवारांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या