काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; ‘हा’ नेता भाजपच्या वाटेवर

Congress | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. विरोधक सत्तेमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. विदर्भामध्ये प्रचाराला सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असलेली पाहायला मिळतेय. काँग्रेसचा (Congress) हुकमी एक्का मानले जाणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला (Congress) राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये आता आणखी एका काँग्रेस (Congress) नेत्यानं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेसचे प्रदेश सचिव असणारे नितीन कोडवते यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा एकदा भाजपने जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसला (Congress) खिंडार पडलं आहे. राज्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. नितीन कोडवते हे विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय आहेत, अशी माहिती समोर आली.

बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नितीन कोडवते यांचा पक्षप्रवेश होणार आहे. गुरूवारी काँग्रेसने सात उमेदवारांची यादी जाहीर केली. गडचिरोली-चिमूर मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळावी, यासाठी नितीन कोडावते स्पर्धेमध्ये होते. मात्र याठिकाणी काँग्रेसला उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही.

नितीन कोडावते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय

सात जागांवर सोलापूरमधून प्रणिती शिंदे. कोल्हापूरमधून शाहू महाराज, पुणे लोकसभा मतदारसंघातून रवींद्र धांगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, अमरावतीमधून वळवंत वानखेडे, लातूरमधून डॉ. शिवाजी कलगे, लातूरमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली पाहिजे. मात्र विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय नितीन कोडावते यांना उमेदवारी दिली नाही. यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी नितीन कोडवते निवडणूक लढवण्यासठी इच्छूक होते.  माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान आणि नितीन कोडवते यांच्यात स्पर्धा झाली.

2019 साली नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते या काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवार होत्या. नितीन यांच्यावर काँग्रेस सचिवची जबाबदारी होती. तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज होऊन ते भाजपमध्ये गेल्याची चर्चा झाली आहे.

News Title – Congress Leader Nitin Kodwate Will Enter In BJP

महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंग धोनीसाठी रोहित शर्माची पोस्ट, क्रिकेटच्या वर्तुळात तुफान चर्चा

…अन् मराठमोळा ऋतुराज झाला CSK चा कर्णधार; वाचा धोनीची दूरदृष्टी!

होळीला रंग खेळा? पण त्वचेची अशाप्रकारे काळजी घ्या

रोहित पवारांच्या जीवाला धोका; सुप्रिया सुळेंनी केली मोठी मागणी

ED मध्ये नोकरी कशी मिळवाल? पात्रता व किती पगार मिळतो?