बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तुम्ही प्रचार करू नका’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं शरद पवारांना पत्र

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य समजलं जातं. महाराष्ट्रात शरद पवारांनी आपल्या राजकीय डावपेचातून भाजपला सत्तेतून पायउतार करून विरोधी बाकावर बसवलं. आता शरद पवार त्यांचा राजकीय फास पश्चिम बंगालमध्ये टाकताना दिसत आहेत. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी शरद पवारांसोबत अनेक दिग्गज नेते ममतांच्या बाजूने प्रचारात उतरले आहेत.

शरद पवार यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा प्रचार करू नये यासाठी काँग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवारांना पत्र लिहलं आहे. शरद पवार आणि तेजस्वी यादव यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करू नये. आपल्या प्रचारामुळे पश्चिम बंगालच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल. त्यामुळे तृणमूलसाठी प्रचार करण्याचं टाळा, असं आवाहन प्रदीप भट्टाचार्य यांनी केलं आहे.

ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरले आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेस आणि डावे पक्ष मिळून निवडणूक लढवत आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या विरूद्ध काँग्रेसने तिसरी आघाडी उघडली आहे. त्यामुळे या मित्रपक्षांची काँग्रेस विरूद्ध भूमिका असू नये, असं काँग्रेसला वाटत आहे.

थोडक्यात बातम्या-

एकाने चूक केली म्हणून संपूर्ण पोलीस दल चुकीचं नसतं- हेमंत नगराळे

“जे आपण कमावलं नाही ते विकून खायचं हा कोणता धर्म?”

सिक्सर किंग फक्त युवराज सिंगच; एका षटकात ठोकले 4 गगनचुंबी षटकार, पाहा व्हिडीओ

खळबळजनक! पराभवानंतर बबिता फोगाटच्या बहिणीची आत्महत्या

अंबानींच्या घरासमोरील स्फोटक प्रकरणात आता मनसेची उडी; बड्या मंत्र्यावर धक्कादायक आरोप

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More