शिवसेनेपेक्षा मनसे चांगली; राज ठाकरेंबाबत काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

मुंबई | राज ठाकरे यांच्याबाबतीत माझं मत हे आहे की ते शिवसेनेसारखे संधीसाधू नाहीत, शिवसेनेपेक्षा मनसे चांगली आहे, असं वक्तव्य काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी केलं आहे. ते ‘न्यूज 18 लोकमत वाहिनी’शी बोलत होते.

मनसेनं मत विभाजन टाळण्यासाठी आघाडीत यावं हे माझं वैयक्तिक मतं आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवारांच्या नंतर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी देखील मनसेचं कौतुक केलं आहे.

निवडणुकीआधी नरेंद्र मोदींचं कौतुक करायचं आणि नंतर त्यांच्यावर टीका करायचं काम शिवसेना करते, असं मिलिंद देवरा म्हणाले आहेत.

दरम्यान, मुंबईचा विकास आणि समस्या सोडवण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे, असं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींनी शरद पवारांची घेतली भेट आणि आघाडीचा तिढा सुटला!

-अनिल अंबानींना 30 हजार कोटी देण्यासाठी नरेंद्र मोदींनी केला राफेल करार- राहुल गांधी

प्रितम मुंडेंच्या विरोधात अमरसिंह पंडित निवडणूक लढणार??

विरोधकांचा पाच वर्षात कोणताही राजकीय भूकंप नाही; मोदींचा राहुल गांधींना टोला

युतीच्या चर्चेसाठी गडकरी, शहा ‘मातोश्री’चा उंबरा ओलांडणार?, हालचालींना वेग