महाराष्ट्र मुंबई

“पियुष गोयल पदाची मर्यादा राखा, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का?”

मुंबई | महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलं आहे. त्यात आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही उडी घेतली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पदाची मर्यादा तरी राखली पाहिजे, केंद्रीय मंत्र्याला हे शोभतं का?, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांना दिला.

पियुष गोयल यांनी पदाची मर्यादा तरी राखली पाहिजे. ते ट्विटवरुन उत्तर देतात. हे केंद्रीय मंत्र्याला शोभते का? केंद्रीय मंत्र्यांनं कसं वागलं पाहिजे. एकमेकांना दोष द्यायचा तर केंद्राचेही अनेक दोष आहेत, असंंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अशी भाषा करु नये. त्यांना रोजगार निर्माण करता आला नाही म्हणून हे लोक महाराष्ट्रात आले. त्यांची राज्यात काळजी घेतली गेली. पण असं आरोप करुन उत्तर मिळणार नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मी सरकारवर नाराज नाही. माझी ऑडियो क्लिप मला माहिती नाही. त्यामुळे मला त्यावर जास्त काही बोलायचं नाही, असंही स्पष्टीकरण कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी पृथ्वीराज चव्हाणांनी दिलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाउन वाढवणं आर्थिक दृष्टीने अनर्थकारी ठरेल- आनंद महिंद्रा

…म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता- तृप्ती देसाई

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांनो सावधान… पुण्यात आज सापडले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; पाहा तुमच्या भागात किती?

अजितदादा कुठं आहेत?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या