बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! 36 तासांच्या नजरकैदेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना अटक

नवी दिल्ली | लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याने याची चर्चा सर्वत्र देशभर आहे. हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या लखीमपूरकडे निघाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना हरगावमध्येच ताब्यात घेऊन गेस्टहाऊसमध्ये ठेवलं होतं.

गेले 36 तास नजरकैदेत असलेल्या प्रियंका गांधी यांना अटक केल्याची माहिती समजत आहे. प्रियंका गांधी यांनी कलम 144 चं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

पोलीस हवं तेव्हा मला अटक करु शकतात पण मी शेतकरी कुटुंबांना भेटल्याशिवाय परतणार नाही, असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं होतं. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. यानंतर प्रियांका गांधी लगोलग पीडित कुटुबांच्या भेटीसाठी निघाल्या होत्या. प्रियंका यांना नजरकैदेत ठेवल्यावर राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं.

दरम्यान,  प्रियांका, मला माहीत आहे तू मागे हटणार नाहीस. तुझ्या हिंमतीमुळे ते तुला घाबरले आहेत. न्यायाच्या या अहिंसक लढाईत आपण देशातील अन्नदात्याला विजय मिळवून देऊच, असं राहुल गांधी म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला धुळ चारत बच्चू कडूंची जिल्हा बँकेत बाजी

“जो अख्ख जहाज खरेदी करु शकतो त्याला ड्रग्ज विकायची काय गरज?”

‘ही घटना तर जालियनवाला बागची पुनरावृत्ती’; लखीमपूर घटनेवरून शरद पवारांचा हल्लाबोल

शाहरुखच्या मुलाआधी ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक

“अमरिंदर सिंग भाजपला मदत करतायेत अन्…”, काँग्रेसचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More