Top News देश

…तर लोक मोदींना हाकलून लावतील- राहुल गांधी

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्यातील मतदान पार पडत आहे. तर दुसरीकडे उर्वरित टप्यातील मतदारसंघात प्रचारतोफा तापल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पश्चिम चंपारण्य येथे जाहीर सभेत ते बोलत होते.

बिहारमधील लोकांना दिल्ली, हरयाणा, बंगळुरूमध्ये रोजगार मिळतो, पण बिहारमध्ये मिळत नाही. याला जबाबदार नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी आहेत. आधी 2 कोटी रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इथे येऊन 2 कोटी रोजगार देण्याबद्दल भाष्य केलं, तर लोक त्यांना हाकलून लावतील, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतला जाळला जातो मात्र यंदा पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी आणि अदानींचे पुतळे जाळण्यात आले. यांचे पुतळे जाळण्यात आले हा काही चांगली गोष्ट नाही पण शेतकरी त्रस्त आहे म्हणून हे घडलं असल्याचं गांधी म्हणाले.

दरम्यान, काही वर्षापूर्वी मोदी इथे आले होते. साखर कारखाने करू म्हणाले होते. पुढच्या वेळी आलो की, साखर मिसळून चहा घेईल. तुमच्यासोबत मोदींनी चहा घेतला का?, असा सवालही गांधींनी सभेत बोलताना केला.

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेचा भगवा फडकवा, हे 30 वर्षांपासून ऐकतोय- शरद पवार

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये- शरद पवार

‘कोरोना-गो’चा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच रामदासा…’; आठवलेंना गृहमंत्र्यांकडून ‘आठवले पॅर्टन’ सदिच्छा

राज्यपाल कोट्यातील एक जागा देण्याचं तीन महिन्यापूर्वी ठरलं होतं, पण आता…- राजू शेट्टी

आता कुमार सानूची ‘जान वाचणं’ कठीण आहे!- शालिनी ठाकरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या