बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधींच्या सभेवरून आघाडीत रंगलाय कलगीतुरा?, पण भाई जगताप म्हणतात…

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांचा 28 डिसेेंबर रोजी मुंबई दौरा आयोजित करण्यात आला होता. याकरिता काँग्रेस पक्षाकडून उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आता काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Mumbai Congress President Bhai Jagtap) यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यावर ओमिक्रॉनचं संकट (Omicron variant) असल्याने हा मेळावा पुढे ढकलण्यात आला असल्याचं भाई जगताप यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारकडून ज्या सुचना देण्यात आल्या आहेत त्याचं पालन करत काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस स्थापनादिनानिमित्त 28 डिसेंबरला हा मेळावा होणार होता. आम्ही राज्य सरकारकडे 15 दिवसांपासून मागणी करत होतो. या मेळाव्यास राज्य सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली होती. परंतु, आम्हाला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो होतो, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली आहे.

दरम्यान, मेळाव्याची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल तसेच हा मेळावा रद्द झाल्याचं राहुल गांधी यांच्या कार्यालयाला कळवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच काँग्रेस नेते नसीम खान (Naseem Khan) यांनी ही रॅली झाली पाहिजे, याकरिता महाविकास आघाडी सरकार विचार करेल. हा विषय खुप तांत्रिक असल्याचं नसीम खान यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

तुम्ही संभाजीनगर म्हणा, तुम्हाला न्यायालयात उभा करतो – गुणरत्न सदावर्ते

मोठी बातमी! लखीमपूर हिंसाचार प्रकरणी एसआयटीचा खळबळजनक खुलासा

“आता आम्ही पण बघणार, किसमें कितना है दम”; संजय राऊत आक्रमक

आणखी 2 बँकांचं खासगीकरण?, निर्मला सीतारमन यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

“शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली, त्यावर मोदींनी कळस चढवला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More