काँग्रेस नेते राहुल गांधींची भाजपवर जोरदार टिका, म्हणाले….
जयपूर | पाच राज्यांंमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थानमधील उदयपुर येथे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना भाजपवर जोरदार टिका केली आहे.
काँग्रेसच्या शिबिरामध्ये झालेली चर्चा पाहून मला प्रश्न पडतो की, देशातील कोणत्या पक्षामध्ये अशी चर्चा होत असेल?, भाजप आणि आरएसएस अशा गोष्टींना कदापि परवानगी देणार नाहीत. आपल्या पक्षात अनेक नेते भाजपमधून दाखल झालेले आहेत. भाजपमध्ये दलित समाजाचा अपमान होतो, असा घणाघात राहुल गांधींनी केला.
देशाच्या संस्था उद्धवस्त करण्यात येत आहेत. जितक्या संस्था नष्ट करण्यात येतील तितकीच अराजकता माजेल, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने रोजगार निर्मितीचा कणा मोडला आहे, अशी जोरदार टिका राहुल गांधींनी केली आहे.
दरम्यान, सरकारने नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून त्याचा फायदा देशातील दोन तीन उद्योगपतींना होत आहे. केंद्र सरकारविरोधातील लढाई प्रादेशिक पक्ष लढू शकत नाहीत. फक्त काँग्रेसचं ही लढाई लढू शकते. आम्ही भाजप आणि आरएसएस संघटनेच्या विचारसरणीचा परभव करू, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘…अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा’; अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा
“पुढील 25 वर्षे शिवसेनाचा मुख्यमंत्री राहिल असं काम करा”
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या…
केतकी चितळेच्या वादग्रस्त पोस्टवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“जरी काँग्रेससोबत गेलो असलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही”
Comments are closed.