बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माफी तर मागितली, पण प्रायश्चित्त कसं करणार?”

नवी दिल्ली | काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. याशिवाय त्यांनी यावरून शेतकऱ्यांची माफी देखील मागितली होती. मात्र, आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी याच मुद्द्यावरून मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, जेव्हा पंतप्रधानांनी कृषी कायदे रद्द करण्यावरून शेतकऱ्यांची माफी तर मागितली पण आता प्रायश्चित्त कसं करणार? हेही संसदेत सांगा, असं सवाल उपस्थित करत मोदींवर निशाणा साधला आहे.

पुढे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, लखीमपूर प्रकरणातील मंत्र्याला बरखास्त कधी करणार? शहिद शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किती आणि कधी? आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे कधी घेणार? एमएसपीवर कायदे केव्हा बनणार? असे प्रश्न विचारत राहुल गांधींनी पुढे म्हटलं आहे, याशिवाय माफी अपूर्णच, असं सुनावलं आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना नुकसान भरपाई कधी मिळणार? असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून विचारला जात आहे. मात्र, आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा आकडा सरकारकडे नाही. त्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्नच नाही, असं केंद्र सरकारकडून संसदेत सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“लोकांनी इंदिरा गांधींना ज्या पद्धतीने उत्तर दिलं, तसंच उत्तर आता मोदींनाही मिळेल”

भारतासाठी दिलासायक बातमी! Omicron विरुद्ध ‘ही’ लस ठरु शकते अधिक प्रभावी

“ममता मोदींच्या इन्फॉर्मर, त्या विरोधकांना फोडून कमकुवत करत आहेत’”

एटीएममधून पैसे काढणाऱ्यांना झटका, मोजावे लागणार इतके रूपये

…त्यातून नागपूरने 325 कोटी कमवले, काहीच टाकाऊ नसतं-नितीन गडकरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More