विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉँग्रेसची गरजू महिलांसाठी मोठी घोषणा!

Congress | आज 8 ऑक्टोबररोजी जम्मू-काश्मिर व हरियाणा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. यानंतर महाराष्ट्राच्याही निवडणुकांचा लवकरच धुराळा उडणार आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीकडून सध्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा चांगलाच प्रचार केला जातोय. तर, दुसरीकडे मविआ नेत्यांचा लोकसभेच्या निकालानंतर विश्वास वाढला आहे. (Congress)

राज्यात महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळतोय.अशात मविआनेही निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. कॉँग्रेसने नुकतीच गरजू महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

कॉँग्रेस नेत्याची मोठी घोषणा

कल्याणमध्ये पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी मोठी घोषणा केलीये. त्यांनी दहा हजार गरजू महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर रिफिलची घोषणा केली आहे. पातकर यांनी ही योजना स्वखर्चातून राबवण्याचा निर्णय घेतलाय. दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. (Congress)

महाविकास आघाडीमध्ये कल्याण पश्चिम आणि पूर्व ही जागा मिळण्यासाठी रणनिती आखली जात आहे. कल्याणमध्ये काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत पक्षाचे पदाधिकारी राजाभाऊ पातकर यांनी स्वखर्चातून 10 हजार गरजू महिलांना मोफत गॅस सिलेंडर रिफिल करुन देण्याची घोषणा केली. याची आता चर्चा रंगत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी रणनिती

राजाभाऊ यांनी विधानसभेसाठी आपण कॉँग्रेसकडून इच्छुक असल्याचं म्हटलंय. अशात त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही मोठी घोषणा केलीये. सध्या जागा वाटपसंदर्भात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू आहे. त्यातच काही ठिकाणी उमेदवारी मिळणार नसल्याचे संकेत मिळताच काही नेत्यांनी थेट पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे कोणती जागा कोणत्या पक्षाला मिळणार, याकडे सर्वांचीच नजर असणार आहे. कल्याण डोंबिवलीत एकूण चार विधानसभा आहेत. या चारही विधानसभांपैकी कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम विधानसभेवर काँग्रेस दावा ठोकणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेदरम्यानच कॉँग्रेस नेते राजाभाऊ पातकर यांनी ही मोठी घोषणा केली आहे.  (Congress)

News Title –  Congress leader Rajabhau Patkar big announcement

महत्त्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! उच्चांकी दरवाढीनंतर सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

जम्मू-काश्मीर, हरियाणाचा कौल कुणाला?; आज होणार निकाल जाहीर

मुंबई म्हाडाच्या 2030 घरांची आज सोडत, घर मिळालं की नाही ते ‘असं’ करा चेक

नवरात्रीचा आज सहावा दिवस, देवी कात्यायनी ‘या’ राशींवर धरणार कृपेचे छत्र!

रेल्वे विभागात नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज