बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अब्दुल सत्तारानंतर काँग्रेसचा ‘हा’ नेताही राजीनाम्याच्या तयारीत!

मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी खातेवाटप अजून झालेलं नाही. अशातच शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्यालही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने गोरंट्याल पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे ते राजीनामा देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. जालना विधानसभा मतदारसंघातून गोरंट्याल तीन वेळा आमदार राहिले आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

अर्जुन खोतकर यांच्यासारखा प्रतिस्पर्धी असूनही जालना जिल्ह्यात काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम केलं. तसेच जालना नगर परिषदही काँग्रेसच्या ताब्यात ठेवली. तरीही मला डावलण्यात आले, असं म्हणत गोरंट्याल यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान,  मंत्रिमंडळ विस्तारावरुन महाविकास आघाडीत नाराजीनाट्य पाहायला मिळत आहेत. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर आघाडी सरकारमधील नाराजी बाहेर येत असल्याचं चित्र आहे.

ट्रेंडिग बातम्या-

शिवसेनेला मोठा धक्का! ‘या’ नेत्यांनं दिला मंत्रिपदाचा राजीनामा

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया…

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More