बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ही निवडणूक केवळ देवेंद्र फडणवीसांचं मुंगेरीलालचं स्वप्न”

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 30 ऑक्टोबर रोजी मतदान होत असून मतमोजणी ही 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे.

भाजपने देगलूरकरांच्या अपेक्षा मांडल्या नाहीत. त्यांना न्याय देण्याचे काम फक्त महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरे गेलो आहोत. तर भाजपने खोटा प्रचार केला असून लोकांमध्ये त्यांनी गैरसमज देखील पसरवले आहे. जी फसवणूकीची परंपरा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारमध्ये चालवली. तीच परंपरा त्यांनी देगलूरमध्ये येऊन देखील चालवली असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी विविध समाजातील लोकांना सोबत घेऊन आम्ही चालत आहोत. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा सत्तेची लालसा भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मनात होती. यामध्ये दबाव धमक्यांचा देखील वापर करण्यात आला. भाजप जाती जातीमध्ये फुट पाडत आहे. ही निवडणूक केवळ देवेंद्र फडणवीस यांचं मुंगेरीलालच जे स्वप्न आहे. मी पुन्हा येईल, पुन्हा येईल, या स्वप्नाला उजाळा देण्याची त्यांची आकांक्षा होती, असंही सचिन सावंत म्हणाले.

दरम्यान, काॅंग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त होती. त्यामुळे त्या जागेवर आता पोटनिवडणुक होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

तुषार भोसलेंची जीभ घसरली, शरद पवारांवर पातळी सोडून टीका

“वानखेडे प्रकरण हे ठाकरे-पवारांची ट्रिक, त्यांना लाज वाटली पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More