बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”हिंदू खतरे में है, हा तर भाजपचा जुमला, आता भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करावेत”

मुंबई | केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांनामध्ये वाढ झाल्याचा आरोप विरोधी पक्ष सातत्याने करत आहे. ‘हिंदू खतरों मै है’ अशी फक्त कल्पना आहे, असं गृहमंत्रालयाने म्हटलं होतं. केंद्रीय मंत्र्यांने केलेला हा दावा एका माहिती अधिकारातून उघड झाला. त्यावर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर काॅंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.

हिंदू धर्म संकंटात आहे. हा भाजपचा जुमला होता. हे स्वत: अमित शहांच्या गृहमंत्र्यांने स्पष्ट केलं आहे. परंतु या भयानक जुमल्यातून भाजपने सत्तेसाठी द्वेषाचे वातावरण पसरवले. धार्मिक उन्मादातून देशात लिंचिंग आणि हत्या झाल्या. त्याबद्दल भाजप नेत्यांवर 302 चे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी टीका सचिन सावंत यांनी भाजपवर केली.

‘हिंदू खतरो मै है’, असं सांगितलं जात आहे. त्याबद्दल नागपूरमधील मोहनीश जबलपुरे यांनी 10 सप्टेंबर रोजी माहिती अधिकारांखाली केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता. यासंंबंधित माहिती आणि पुरावे द्या, अशी मागणी ‘मोहनीस जबलपुरे’ यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यावर काल्पानिक प्रश्नांवर उत्तर देण्यासंबंधित आमच्याकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यासाठी तुम्ही गृहमंत्रालयाशी विचारणा करावी, असं माहिती अधिकारी व्ही.एस राणा यांनी मोहनीस जबलपुरे यांना सांगितलं आहे. त्यानंतर या घटनेवर देशात अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दरम्यान, गेल्या काही वर्षात देशात धार्मिक घटनांमध्ये वाढ होतांना दिसत आहेत. अनेक राज्यात धर्मावरून लोकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशात त्यावरून एक नवा वाद सुरू आहे.

पाहा ट्विट- 

थोडक्यात बातम्या-

“लोकं सांगतात…एका एकराला 18 कोटी मिळतायेत, दादा तो रस्ता आमच्या वावरातून न्या की”

“श्रीराम, श्रीकृष्ण आणि भगवान महादेव हे भारतीय मुसलमानांचे पूर्वज!”

“मनसेने कधीही सत्तेसाठी शिवसेनेसारखी लाचारी पत्करली नाही”

अॅम्ब्युलन्सच्या सायनरचा आवाज बदलणार, आता वाजणार ‘ही’ नवी धून

मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून राज्यातील शाळा सुरु, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More