बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीमध्ये श्रेय वादाची लढाई?; मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेत्याचा राष्ट्रवादीला इशारा

मुंबई | काही दिवसांपुर्वी राज्यात लस उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न चालू होते. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केंद्र सरकारवर वेळोवेळी टीका केली होती. आता राज्याला थेट लस बाजारातून घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली होती. आता याच लसीकरणावरून महाविकास आघाडीमध्ये श्रेय वादाची लढाई होताना दिसत आहे. त्यांनतर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी  ट्विट करत राष्ट्रवादीवर टीका केली आहे.

राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे आणि मोफत लसीकरण करण्याची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. थोडसं वेगळं वाटतंय. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण त्याची घोषणा सरकार करणार की केवळ एक मित्र पक्ष करणार?, असा सवाल संजय निरूपम यांनी उपस्थित केला आहे. भीषण महामारीत क्रेडिट घेण्याचं राजकारण अत्यंत वाईट आहे. राष्ट्रवादीने असे प्रकार करू नयेत, असा सल्ला देखील संजय निरूपम यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय झाल्याचं स्पष्ट केलं होतं. नुकत्याच झालेल्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी जाहीर केलं आहे, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर त्यांनी काही वेळातच ते ट्विट डिलीट केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘अजून काही वर्ष ब्रिटीश भारतात पाहिजे होते’; दिग्दर्शक केदार शिंदे यांची फेसबुक पोस्ट

भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहावेना; सुंदर पिचाई यांनी उचललं मोठं पाऊल!

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘अँड द ऑस्कर गोज टू…’नोमडलँड’; सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं

“महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More