बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खोटी स्वप्ने दाखवून भारताला बेरोजगार करणारे मोदी हे इतिहासातील एकमेव पंतप्रधान”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच अनेकांनी त्यांच्यावर टीका करत खोचक ट्विट करत शुभेच्छाही दिल्यात.

दुसरीकडे काँग्रेसकडून हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस असल्याचं म्हटलं जात आहे. दोन कोटी नोकऱ्यांच्या आश्वासनावरुन काँग्रेसने नरेंद्र मोदींची (Narendra Modi) खिल्ली उडवली आहे.

भाजपने सत्तेत आल्यावर दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची आठवण करुन देत काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी यांनी ट्विटरवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केलाय.

पंतप्रधानांचा वाढदिवस #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस म्हणून साजरा करायची कोणत्याही तरुणाला हौस नाही. पण तरुणांना खोटी स्वप्ने दाखवून तरुण भारताला बेरोजगार करणारे नरेंद्र मोदी हे इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत, अशी टीका त्यांनी केलीये.

 

थोडक्यात बातम्या- 

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘ही’ सर्वात मोठी घोषणा!

फडणवीसांसमोर तरूणांचा राडा; काहीही न बोलताच फडणवीस निघून गेले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More