बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुलाखतीनंतर उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपला काँग्रेसचं जोरदार प्रत्युत्तर!

मुंबई | शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिवसेनेची आगामी भूमिका आणि योजना निश्चित करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुलाखत दिली. शिवसेनेचे दैनिक मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनाप्रमुखांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांना विविध प्रश्न विचारत बंडाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी यावेळी बंडखोरांवर सडकून टीका केली.

कालच्या (दि. 26) सामनाच्या (Samna) अंकात ही मुलाखत प्रसिद्ध झाली होती. तसेच अनेक प्रसारमाध्यमांवर देखील ही मुलाखत दाखवण्यात आली. त्यावर विरोधी पक्षांनी टीका केली. संजय राऊत हेच मुलाखतकार असल्याने त्यांनी या मुलाखतीची खिल्ली उडवली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvsis) आणि भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) या मुलाखतीला फिक्स मॅच म्हंटलं होतं. त्यावर आता काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेनेची बाजू घेत त्यांच्यावर टीका केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आता त्यांनी शिवसेनेची बाजू घेत, विरोधकांवर सडेतोड टीका केली आहे. त्यांनी अक्षय कुमार (Akshay Kumar) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर टाकत भाजप नेत्यांवर निशाणा साधला. त्यात त्यांनी मुलाखत पंतप्रधानांची घेतात तशी हवी… काय ते देशहिताचे प्रश्न…. काय ती जनहिताची उत्तरे…. काय ती पंतप्रधान निवासातील मुलाखत…. राष्ट्रीय कार्यक्रम एकदम ओक्के… असं म्हंटलं आहे.

यात अभिनेता अक्षय कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही आंबे कसे खाता? हा प्रश्न विचारतो. कापून खाता? आंब्याच्या कोयीसह चोखून खाता? की वॉश बेसिनमध्ये उभे राहून आनंद घेत खाता? असे प्रश्न कुमार विचारतो आहे.

 

 

थोडक्यात बातम्या –

‘सत्तेत असो किंवा नसो अजित पवार नेहमी…’, अनिल बोंडेंची बोचरी टीका

‘ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झाले’, उद्धव ठाकरे म्हणतात…

वाढदिवस उद्धव ठाकरेंचा पण चर्चा होतेय एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शुभेच्छांची

रक्षाबंधनला भावाकडे जाऊ न शकणाऱ्या बहिणींसाठी खुशखबर! टपाल विभागाचा मोठा निर्णय

‘याच पालापाचोळ्यांनी इतिहास घडवलाय लक्षात ठेवा’, उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More