रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच सोनिया गांधींना ईडीकडून समन्स जारी
नवी दिल्ली | काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तब्येतीच्या कारणामुळे सोनिया गांधी काही दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत होत्या.
सोनिया गांधी यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच नॅशनल हेराल्ड प्रकरणात 23 जून रोजी त्यांची ईडी चौकशी होऊ शकते. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने सोनिया गांधी यांना समन्स जारी केले असून 23 जून रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
रूग्णालयातून डिस्चार्च मिळताच सोनिया गांधींच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. याआधीही सोनिया गांधींना ईडीने समन्स बजावले होते. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी वेगळी तारीख मागून घेतली होती.
दरम्यान, सोनिया गांधी यांना 2 जून रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर 12 जूनला त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, आता सोनिया गांधीना डिस्चार्ज मिळाला असून त्यांना आता ईडीसमोर हजर राहावं लागणार आहे.
थोडक्यात बातम्या-
केंद्रीय निवडणूक आयोगाचाही काँग्रेसला दणका, मतमोजणीला सुरूवात
“कोणी कितीही पावसात भिजलं तरी निवडून येणार नाही”
भाजपच्या ‘या’ दोन मतांविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव
‘राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर…’, दीपाली सय्यद यांची तुफान टोलेबाजी
अग्निवीरांसाठी सर्वात मोठी घोषणा, आता ‘इतका’ पगार मिळणार
Comments are closed.